'लावणी क्वीन' गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ केल्यानंतर रुपेरी पडदा गाजवायला गौतमी सज्ज झाली आहे. गौतमीचा 'घुंगरु' हा आगामी सिनेमा असून या सिनेमातील पहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मी करते तुम्हाला मुजरा' असे या लावणीचे नाव आहे. गौतमीची 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'मी करते तुम्हाला मुजरा' या लावणीतील ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि गौतमीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, त्याला लाल रंगाची जरीची काठ, साज, केसात गजरा, नथा असा काहीसा गौतमीचा लुक आहे. 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी साईनाथ पाटोळे आणि मारुती सोनू यांनी लिहिली आहे. गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.