बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ आणि किवाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे.

लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी राजस्थान नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत.

सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडणार आहे.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी 100 ते 150 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे.

लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

सिद्धार्थ-कियारा लग्नानंतर मुबंईतील जुहू परिसरात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.