अभिनेत्री नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. नोरा नुकतीच 'द कपिल शर्मा' या कार्यक्रमात दिसून आली. 'द कपिल शर्मा' या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. कपिल शर्माने नोराच्या सौंदर्यांचे प्रचंड कौतुक केले. नोरा म्हणाली, मी आजवर पाणी-पुरी खाललेली नाही. नोराच्या या भाष्यावर चांगलाच हशा पिकला. 'दिलबर गर्ल'ने खुलासा केला की, तिचा सहकलाकारासोबतचा वाद मारामारीपर्यंत पोहोचला होता. कपिल शर्माने नोराला विचारलं, तुझं कधी कोणत्या सहकलाकारासोबत भांडण झालं आहे का? कपिलच्या प्रश्नाला नोरानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. उत्तर देत नोरा म्हणाली, शूटिंगदरम्यान सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यावेळी कसलाच विचार न करता मी त्याच्या कानशिलात लगावली.' नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.