मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर शरद पोंक्षे त्यांची मतं मांडत असतात.
शरद पोंक्षे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहित आहे.
शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
शरद पोंक्षें यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा फोटो शेअर केला आहे.
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर 'मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदूंची भीती वाटते, हिंदूनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केले आहे', असं लिहिलेलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर आधारित असलेली शरद पोंक्षे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पोंक्षे यांचा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रचंड अभ्यास आहे.
व्याख्यानाच्या माध्यमातून शरद पोंक्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.
शरद पोंक्षे सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.