भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.



इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट तयार करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.



सध्या नासाकडून हे सॅटेलाईट तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कामासाठी हे सॅटेलाईट भारतात दाखल होईल.



नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निसार सॅटेलाईट भारतात दाखल होईल.



निसार उपग्रह बनवण्याची इस्त्रो आणि नासा यांची संयुक्त मोहिम आहे. निसार सॅटेलाईट 2024 मध्ये लाँच करण्यात येईल.



इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या देखरेखीखाली काही चाचण्या पार पडतील. यासाठी इस्त्रोचे अध्यक्ष 3 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाले आहेत.



लवकरच निसार सॅटेलाईट भारतात दाखल होईल. सॅटेलाईट भारतात पाठवण्याआधी त्याच्या काही चाचण्या सुरू आहेत.



हा उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेश यांबाबतची अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल. हे सॅटेलाईट याचं अधिक खोल आणि विस्तृत निरीक्षण करेल.



कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्जन लॅबमध्ये सॅटेलाईट भारतात रवाना करण्यापूर्वी परीक्षण करण्यात येत आहे.



नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरु आहे. निसार उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल.



इस्त्रो आणि नासा यांच्यामध्ये 2014 मध्ये 2,800 किलो वजनी उपग्रह बनवण्याचा करार झाला होता.