इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत टीव्ही अभिनेत्री निया शर्माचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. नियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. निया शर्माने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निया नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कहर करताना दिसत आहे. फोटोंमध्ये निया ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेस आणि व्हाइट हाय हिल्समध्ये पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये निया शर्माने मनमोहक पोज देत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत.