तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादाच्या पावित्र्याबाबत वाद चांगलाच वाढत चालला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम

आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) दोन दिवसांत दोन दावे केले आहेत.

नवा आरोप करत नायडू सरकारने प्रसादात फॅटी तूप व्यतिरिक्त गोमांस,

डुकराची चरबी आणि फिश ऑइल मिसळल्याचे म्हटले आहे.

प्रयोगशाळेच्या अहवालातही याची पुष्टी झाली आहे.

हे लाडू कसे तयार होतात ?

1) लाडू बनवण्यासाठी बेसन, बेदाणे, तूप, काजू आणि वेलची वापरतात.

2) लाडू बनवण्यासाठी प्रथम तूप योग्य तापमानाला गरम करून त्यात बेसन घालून भाजले जाते.

3) काजू, वेलची, बेदाणे आणि खडी साखर मिसळलेले लाडूचे मिश्रण
मुरवले जाते.

4) त्यानंतर हाताने वळून स्वादिष्ट लाडू तयार करतात.