छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या घटनेवरुन राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. सदर घटनेवरुन राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आज या घटनेवरुन महाविकास आघाडीकडून राजकोटमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी पहिले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही करायचे ते करा गोळ्या घाला हालणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असंही नारायण राणेंनी सांगितले.