शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

मात्र, प्रत्यक्षात तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले नव्हते.

Image Source: Facebook

तर तो बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली होती.

Image Source: pinterest

त्यानंतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला असला तरी याप्रकरणातील तपशीलाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Image Source: Facebook

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर गेला होता.

Image Source: Facebook

तिकडून ऋषिराज सावंत, मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाला.

Image Source: pinterest

बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Image Source: pinterest

ऋषिराज सावंतचे विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचले होते. मात्र, पुण्यात गोंधळ उडाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हे प्लेन चेन्नईला उतरवण्यास भाग पाडण्यात आले होते.

Image Source: Facebook

त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि हे विमान रात्री नऊच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झाले होते.

Image Source: pinterest

तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, ऋषिराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या. प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला. त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो.

Image Source: Facebook

ऋषिराज सावंत आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता, मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला, हा प्रश्न देखील तानाजी सावंत यांना पडला होता.

Image Source: Pinterest