विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजना काढली होती.
ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा योजना देखील थांबवण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहे.
तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं या योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
तसेच शिवभोजन थाळी योजना देखील बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे.