यामुळे आता पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दिल्लीत आम आदमी पार्टीच्या दारुण पराभवानंतर आता पंजाबमध्ये पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांचा मार्ग अवलंबू शकतात, अशी चर्चा आहे.
पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी हा दावा केला आहे.
बाजवा म्हणतात की आपचे 30 पेक्षा अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही पक्ष बदलू शकतात.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाने आपच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
आम आदमी पार्टीचे सुप्रिमो, अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्याकडून पराभव झाला आहे.
भाजपचे नेते सुभाष शर्मा म्हणाले की, खोट्या आश्वासनांच्या आधारे राज्य जास्त काळ टिकू शकत नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे.