राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

हवामान विभागाने राज्यात पुढील 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

Image Source: unsplash

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Image Source: unsplash

समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Image Source: unsplash

त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.

Image Source: unsplash

यंदा र्नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत.

Image Source: unsplash

केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवलाय.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash