Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

Image Source: ABP Network

अक्कलकोट एमआयडीसी परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर आग लागली.

Image Source: ABP Network

कारखान्यातील कच्च्या मालामुळे ही आग वेगाने पसरत गेली.

Image Source: ABP Network

अग्निशमन दलाने शनिवारी रात्री कारखान्यातून जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Image Source: ABP Network

तर या कारखान्याचे मालक उस्मान उस्मानभाई मन्सूरी आणि त्यांचे कुटुंबीय अनस मन्सूरी, शिफा मन्सूरी, चिमुकला युसूफ मन्सूरी हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत.

Image Source: ABP Network

या कारखान्यात मोठ्याप्रमाणावर सामान असल्याने अग्निशमन दलाला आतमध्ये शिरायला जागा मिळत नव्हती.

Image Source: ABP Network

अखेर अग्निशमन दलाने जेसीबीच्या साहाय्याने येथील एक भिंत फोडली आहे.

Image Source: ABP Network

या फोडलेल्या भिंतीच्या भगदाडातून अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये शिरले आहेत.

Image Source: ABP Network

फोम आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन अग्निशमन दलाचे जवान आत शिरले आहेत.

Image Source: ABP Network

आगीची तीव्रता कमी झाली असली तरी कारखान्यात सध्या काळ्या धुराचे साम्राज्य आहे.

Image Source: ABP Network

त्यामुळे कारखान्याच्या आतल्या बाजूला हवेत ऑक्सिजनही शिल्लक राहिलेला नाही.

Image Source: ABP Network