पुण्यात मंगळवारी तापमानात लक्षणीय वाढ झाली असून शिवाजीनगर येथे मोसमातील सर्वाधिक 37.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुढील तीन दिवसांत शहरात 37 ते 38 अंशांचा उच्चांक राहण्याची शक्यता आहे. ( Image Credit- ABP Gallery )


भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. ( Image Credit- ABP Gallery )



शुक्रवारी, 8 मार्चला शिवाजीनगर येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु अवघ्या चार दिवसांत कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. ( Image Credit- ABP Gallery )



सर्वसाधारण पातळीच्या तुलनेत 12 मार्चला कमाल तापमान 2.1अंशांपेक्षा अधिक होते. त्याच वेळी सर्वात कमी 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ( Image Credit- ABP Gallery )



पुणे जिल्ह्यातील इतर भागात शिवाजीनगरपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. लवळे येथे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. ( Image Credit- ABP Gallery )



उर्वरित भागात अंदाजे 37अंश सेल्सिअस तापमान असते. किमान तापमानापेक्षा कमाल तापमानात दुपटीने वाढ झाल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. ( Image Credit- ABP Gallery )



पुणे शहर आणि परिसरात सध्या आकाश निरभ्र आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा राज्यावर लक्षणीय परिणाम होत आहे. ( Image Credit- ABP Gallery )



राज्यात वाऱ्यातूनही ओलावा मिळतो, त्यामुळे आर्द्रता वाढते. ( Image Credit- ABP Gallery )



परिणामी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे, अशी माहिती आयएमडी पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली. ( Image Credit- ABP Gallery )