9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती.
भारतीय संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 ला करण्यात आला होता.
26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने संविधान भारतात लागू करण्यात आले.
त्यादिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे.
भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र, लोकशाही म्हणून परिभाषित करण्यात आले.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानले जाते.
सामाजिक न्याय, मूलभूत हक्क यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला.