राज ठाकरे मातोश्रीवर, शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेना

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाला राज ठाकरेंचं अभिवादन

Image Source: ABP MAJHA

काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

Image Source: ABP MAJHA

आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.

Image Source: ABP MAJHA

काहीवेळापूर्वीच राज ठाकरे हे दादरमधील आपल्या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली होती.

Image Source: ABP MAJHA

राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

Image Source: ABP MAJHA

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते.

Image Source: ABP MAJHA

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते,

Image Source: ABP MAJHA

तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर पोहोचले आहेत.

Image Source: ABP MAJHA

राज ठाकरे मातोक्षीवर पोहोचले, भावाच्या हातात हात दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Image Source: ABP MAJHA

त्यानंतर पुष्पगुच्छ दिला हातात हात दिला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित असल्याचं दिसून आले.

Image Source: ABP MAJHA

मातोश्रीवर एकचा आवाज घुमल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंच्या खाद्यांवर हात ठेवून आलिंगन दिलं.

Image Source: ABP MAJHA