जगात सर्वात स्वस्त डिझेल कुठे मिळतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

जागतिक क्रूड ऑईलच्या दरांमध्ये होणारे बदल आणि देशांतर्गत करांच्या धोरणांमुळे डिझेलच्या दरात सातत्यानं बदल होत राहतात.

Image Source: pexels

जगभरात डिझेलचे दर प्रत्येक देशात वेगवेगळे असतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डिझेलची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेवर, कर धोरणावर, सबसिडीवर आणि तेल साठ्यावर अवलंबून असते.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीये का? जगातील सर्वात स्वस्त डिझेल कुठे मिळतं...?

Image Source: pexels

जगातील सर्वात स्वस्त डिझेल दक्षिण अमेरिकेतील देश 'व्हेनेझुएला'मध्ये (Venezuela) मिळतं.

Image Source: pexels

या देशात डिझेलची किंमत 0.035 डॉलर प्रति लिटर आहे.

Image Source: pexels

'व्हेनेझुएला'मध्ये डिझेलची किंमत भारतीय रुपयांत सुमारे 3.02 रुपये प्रति लिटर आहे.

Image Source: pexels

'व्हेनेझुएला'मध्ये डिझेलची किंमत कमी होण्याचं सर्वात मोठे कारण म्हणजे, 'व्हेनेझुएला'मध्ये क्रूड ऑईलचा मोठा साठा आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, देशात सर्वात स्वस्त डिझेल अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांमध्ये उपलब्ध आहे, जिथे डिझेलचा दर सर्वात कमी 78.05 रुपये प्रति लिटर आहे.

Image Source: pexels