कोकणात पारंपरिक कौलधर्म (गावच्या दैवताची परंपरा) पाळली जाते.
Published by: जयदीप मेढे
कोकणात पारंपरिक कौलधर्म (गावच्या दैवताची परंपरा) पाळली जाते.
काही वेळा कौलातून असे सूचित होते की, नैवेद्य म्हणून मांसाहार अर्पण करावा लागतो
ज्यात कोंबडीचा नैवेद्य दिला जातो.
गौरी म्हणजे पार्वती आणि ती शक्तीचं रूप आहे.
गौरी येते तेव्हा तिला घरचं सगळ्यात उत्तम जेवण दिलं जातं
कोकणात हे जेवण म्हणजे भाकरी आणि कोम्बडं वरण. हे गौरी मायच्या मानाचं जेवण असतं.
कोकणातील काही ठिकाणी शाक्त परंपरा (शक्ती उपासना) आहे, जिथे मांसाहारी नैवेद्य स्वीकृत असतो. त्यामुळे कोंबडीसारखा नैवेद्य शक्तीस्वरूप देवीला अर्पण केला जातो.
ही परंपरा काही घरांपुरती मर्यादित असते आणि ती त्यांच्या कुटुंबपरंपरेवर आधारित असते
प्रत्येक घरातील श्रद्धा, पूर्वजांची प्रथा, आणि कौलावर विश्वास ठेऊन हा नैवेद्य दिला जातो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.