पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट पसरली होती.
Published by: जयदीप मेढे
या दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 25 भारतीयांचा आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.
मात्र या भ्याड हल्ल्यातील दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं होतं.
सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे.
हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं.
दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता.
त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.