भारताने पाकिस्तानसोबत आतापर्यंत एकूण चार मोठे युद्ध लढले आहेत.

1947-1948 चे युद्ध ( पहिले काश्मीर युद्ध )

हे युद्ध जम्मू आणि काश्मीरच्या राज्याच्या अधिपत्यावरून झाले. पाकिस्तानने कबायली हल्लेखोरांना पाठिंबा दिला त्यामुळे हे पहिले झाले होते.

1965 चे युद्ध

हे युद्ध देखील काश्मीरच्या मुद्द्यावरूनच झाले होते.

1971 चे युद्ध

हे युद्ध पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) झालेल्या राजकीय आणि सामाजिक अशांततेमुळे झाले.

1999 चे युद्ध ( कारगिल युद्ध )

हे युद्ध जम्मू आणि काश्मीरमधील कारगिलच्या उंच डोंगराळ प्रदेशात झाले. पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून भारतीय चौक्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता.

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर नेहमी चकमक होत राहते.

सध्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

सध्याची परिस्तीती पाहता भारत आणि पाकिस्तानात युध्द होण्याचे संकेत दिसत आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)