जपानमध्ये सर्वात मोठी सुनामी कधी आली होती

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

जपानमध्ये 11 मार्च 2011 रोजी सर्वात मोठी सुनामी आली होती. ही सुनामी जपानच्या इतिहासातील एक अत्यंत धोकादायक आणि नुकसान करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली.

Image Source: Pinterest

11मार्च 2011 रोजी जपानमध्ये 9.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र तोहोकू प्रदेशाजवळील समुद्रात होते.

Image Source: Pinterest

भूकंपानंतर लगेचच जोरदार सुनामी आली आणि काही ठिकाणी तब्बल 40 मीटर उंच लाटा उसळल्या.

Image Source: Pinterest

ही सुनामी जपानच्या ईशान्य किनारपट्टीवर सर्वाधिक तडाखा देणारी ठरली.

Image Source: Pinterest

त्या काळात फुकुशिमा दाईची न्यूक्लियर पावर प्लॅन्ट प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

Image Source: Pinterest

या आपत्तीत सुमारे 20,000 लोक मृत किंवा बेपत्ता झाले, हजारो लोकांना घर गमवावं लागलं आणि प्रचंड मालमत्तेचे नुकसान झाले.

Image Source: Pinterest

ही आपत्ती जपानच्या अर्थव्यवस्थेसाठीही मोठा धक्का ठरली; जगभरातील अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

Image Source: Pinterest

ही घटना जगभरातील लोकांसाठी एक मोठी समस्या बनली.

Image Source: Pinterest

2011 मधील सुनामी आजही जपानमधील लोकांच्या आठवणीत आहे.

Image Source: Pinterest