पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा दुखापत झाली आहे.
ममता बॅनर्जी या असनसोल लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होत्या.
दुर्गापूर येथून त्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार होत्या.
हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना चढून ममता बॅनर्जी आतमध्ये गेल्या.
मात्र, आत गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा अचानक तोल गेला.
आणि त्या खाली कोसळल्या.
सुदैवाने त्यांच्या अंगरक्षकांनी ममता यांना लगेच सावरले.
यावेळी ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाली.
मात्र, ममता बॅनर्जी यांनी आपला दौरा रद्द न करता त्या असनसोल मतदारसंघात गेल्या.
आधी देखील ममता बॅनर्जी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.