हरियाणाच्या हिसार येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी गुप्तचरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Image Source: Instagram

पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकारी अहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश युट्युबर ज्योती मल्होत्रासोबत सतत संपर्कात होता.

Image Source: Instagram

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या काळातही ज्योती दानिशच्या संपर्कात होती.

Image Source: Instagram

ज्योतीने काश्मीरमध्ये कुणाकुणाशी भेट घेतली याची माहिती आता सुरक्षा यंत्रणा गोळा करत आहेत.

Image Source: Instagram

विशेष म्हणजे, ज्योतीच्या पाकिस्तान भेटीचा सर्व खर्च पाकिस्तान हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेल्या दानिशने उचलला होता.

Image Source: Instagram

अहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश हा पाकिस्तानच्या दूतावासात राजनैतिक अधिकारी होता.

Image Source: Instagram

ज्योतीची दानिशसोबत पहिली भेट 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान झाली होती. त्या वेळी ती एका प्रतिनिधीमंडळासोबत गेली होती.

Image Source: Instagram

भारतात परतल्यावरही ती दानिशच्या संपर्कात राहिली आणि त्याच्या शिफारसीवर ती पुन्हा पाकिस्तानला गेली.

Image Source: Instagram

ज्योतीच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी तिच्या मोबाईल डिव्हाइसेस, सोशल मीडिया खात्यांचे विश्लेषण केले.

Image Source: Instagram