राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock
राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
Image Source: iStock
एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
Image Source: iStock
ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.
Image Source: iStock
भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना कालपासून 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत.
Image Source: iStock
रायगड जिल्ह्यात देखील काल पासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Image Source: iStock
एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल.
Image Source: iStock
यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते.
Image Source: iStock
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते.