भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash.com

दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

Image Source: unsplash.com

गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल 8000 रुपयांनी घसरला.

Image Source: unsplash.com

सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तीन हजारांची घसरण झाल्याचं दिसून आलं.

Image Source: unsplash.com

शनिवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 92 हजार 910 रुपये इतका आहे.

Image Source: unsplash.com

अमेरिका आणि चीनमध्ये आयात शुल्कावरुन सुरू झालेल्या चर्चेचा परिणाम आता सोन्याच्या किमतींवर होत असल्याचं सांगितलं जात आहे.

Image Source: unsplash.com

दरम्यान, सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात लाखांच्या घरात मुसंडी मारल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत साशंकता दिसून आली होती.

Image Source: unsplash.com

गेल्या दोन दिवसांचे उतरते भाव पाहता ग्राहकांचा पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीकडे ओढा वाढण्याची शक्यता आहे.

Image Source: unsplash.com