भारतीय सैन्य दलानं पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 26 जणांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.

Image Source: ABP Majha

भारतीय सेनेनं, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे कॅम्प्स उद्ध्वस्त केले आहे.

Image Source: ABP Majha

फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली.

Image Source: ABP Majha

भारतीय सेनेनं तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवर लक्ष्य साधलं.

Image Source: ABP Majha

यामध्ये जन्श-ए-मोहम्मदचं हेडक्वॉर्टसही उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.

Image Source: ABP Majha

भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे.

Image Source: ABP Majha

भारतीय सशस्त्र दलांनी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले.

Image Source: ABP Majha

पाकिस्तानातील बारावं सर्वात मोठं शहर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आहे.

Image Source: ABP Majha

हे शहर लाहोरपासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे आणि जैशचं मुख्यालय 'जामिया मस्जिद सुभान अल्लाह' परिसरात आहे.

Image Source: ABP Majha