सलमान खान पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

त्यांच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी परिधान केलेल्या एका घड्याळावरून वाद निर्माण झाला आहे

हे घड्याळ राम जन्मभूमीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे

ज्यामुळे काही मुस्लिम धर्मगुरुंनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सलमान खान यांनी हे घड्याळ परिधान करणे असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी सलमान खानला या कृत्याबद्दल माफी मागण्यास आणि शरिया कायद्याचे पालन करण्यास सांगितले आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

काही लोक सलमान खान यांचे समर्थन करत आहेत, तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत.

सलमान खान यांनी स्वतः यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.