बीसीसीआयनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना अधिक मानधन देण्याची योजना आखली आहे. ( Image Credit- PTI )



बीसीसीआयनं खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना लागू केली आहे. ( Image Credit- PTI )



आता एका सीझनमध्ये 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 45 लाख रुपये मिळतील. ( Image Credit- PTI )



तर एका सीझनमध्ये 50 ते 74 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति सामना 30 लाख रुपये मिळतील. ( Image Credit- PTI )



धर्मशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली. ( Image Credit- PTI )



एका सीझनमध्ये सुमारे 10 कसोटी सामने खेळणाऱ्या कसोटीपटूला 1.5 कोटी रुपये (रु. 15 लाख प्रति सामना) संभाव्य सामना फी पेक्षा जास्त म्हणजेच, 4.50 कोटी रुपयांचे मोठं प्रोत्साहन मिळेल. ( Image Credit- PTI )



याशिवाय अव्वल क्रिकेटपटूंना वार्षिक केंद्रीय करारांतर्गत 'रिटेनर फी' देखील मिळणार आहे. ( Image Credit- PTI )



काही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला प्राधान्य न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अलीकडे इशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांसारखे युवा खेळाडू रणजी ट्रॉफी सोडून आयपीएलच्या तयारीत व्यस्त होते. ( Image Credit- PTI )



अशा परिस्थितीत बीसीसीआयनं या निर्णयाद्वारे खेळाडूंचं लक्ष कसोटी क्रिकेटकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ( Image Credit- PTI )