भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
दरम्यान, केरळमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
आयएमडीच्या अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
26 आणि 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
त्यातही 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत, तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
याशिवाय पावसाबरोबर गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Photo Credit : unsplash)
नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त असेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)
गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. (Photo Credit : unsplash)