नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. (Photo Credit : unsplash)
आता विदर्भातसह मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
काही ठिकाणी गडगडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलीय. (Photo Credit : unsplash)
मराठवाड्यात विशेषतः जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता असल्याचं खुळे म्हणाले. (Photo Credit : unsplash)
आज आणि उद्या खान्देश भागातील नाशिक नगर, जळगांव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : unsplash)
25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)