वारीची ही प्रथा फार जुनी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार वार्या ( यात्रा ) पाहायला मिळतात. 1 चैत्री यात्रा 2 आषाढी यात्रा 3 कार्तिकी यात्रा 4 माघी यात्रा कार्तिकी यात्रा म्हणजेच कार्तिकी एकादशी ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. असे म्हणतात की, शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन पाहायला मिळतात. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते, आणि एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो.