वाहन निर्माता स्कोडा (Skoda) कंपनीनं त्यांची नवी कार स्लाव्हियाचा (Slavia) फर्स्ट लूक समोर आलाय. सेडान कारला पसंती दर्शवणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्तम पर्याय असणार आहे. स्कोडाचा भारतातील सेडान कारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. यामुळं ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढलीय. ही कार पुढच्या वर्षी बाजारात दाखल होणार आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झालीय. तर, या कारची खासियत काय? जाणून घेऊयात. या कारला पहिल्यांदा पहिल्यानंतर ही कार डी-सेगमेन्टची कार दिसते. या कारला जबरदस्त लूक देण्यात आलाय. ही कार जवळपास स्कोडाच्या Octavia सारखीच दिसते. या कारची लांबी 4 हजार 541 एमएम इतकी आहे. तर, रुंदी 1 हजार 752 एमएम आहे. यात हेक्सागोनल क्रोम ग्रिलला नवी डिजाईन देण्यात आलीय.