राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात आल्यानंतर आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

चव्हाण यांनी भाजप मुख्यालयात पाऊल ठेवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.

त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्षे विधानसभा आणि लोकसभा गाजवणारे नेते

विविध मंत्रीपद भुषविलेल्या तसेच दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत

असे फडणवीस यांनी म्हटले.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, असे म्हटले.

त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

Thanks for Reading. UP NEXT

LPG Price Hike : सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण

View next story