भारतात ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहिल्या वहिल्या बॅटल रॉयल गेमची घोषणा केली असून अंडरवर्ल्ड गँग वॉर्स असं नाव आहे. मेहेम स्टुडिओज हा गेम लॉन्च करत आहे. मंगळवारी या गेमची घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली तब्बल 500 ड्रोन्स मुंबईच्या आकाशात उडवत या गेमचं नाव सर्वांसमोर जाहीर करण्यात आलं. मेहेम स्टुडिओजने मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन शोच्या माध्यमातून या गेमच्या नावाचं अनावरण केलं. गेमचं नाव झळकल्यानंतर एक क्यूआर कोडही यावेळी तयार झाला. ज्याला उपस्थितांनी स्कॅन केलं असता थेट गेमचा युट्यूबवरील टीझर सर्वांना पाहायला मिळाला. 'अंडरवर्ल्ड गँग वॉर्स' हा गेम भारतातील दोन टोळींच्या शत्रुत्वाच्या अवतीभोवती फिरणार आहे 22 मे रोजी या गेमचं प्रिरजीस्ट्रेशन सुरु होणार आहे.