छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शिवांगी जोशीचा आज 27 वा वाढदिवस आहे
शिवांगीचे चाहते तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत
लवकरच आता शिवांगी ही ‘खतरों के खिलाडी 12’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
शिवांगीला अनेक रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्या पण त्या तिनं नाकारल्या होत्या
आता ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये सहभागी होण्यासाठी शिवांगी का तयार झाली? असा प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.
आता या प्रश्नाचं उत्तर शिवांगीनं उत्तर दिलं आहे.
मुलाखतीमध्ये शिवांगीनं सांगितलं, 'मला काही रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्या पण बाकी प्रोजेक्ट्समुळे मला त्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या. पण आता मला वाटतं की, खतरों के खिलाडीमध्ये भाग घेण्याची ही योग्य वेळ आहे. '
ती म्हणाली, 'मला अनेक गोष्टींचा फोबिया आहे. ज्या गोष्टींची मला भिती वाटते, त्या गोष्टींबद्दल माहिती घेण्यासाठी मी खतरों के खिलाडीमध्ये सहभाग घेणार आहे. या शोसाठी फिजीकली आणि मेंटली स्ट्रॉन्ग राहणं आवश्यक आहे. '
शिवांगी आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या कार्यक्रमामधील अभिनेता मोहसिन खान यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.
आता खतरों के खिलाडी 12मध्ये शिवांगीचे वेगवेगळे स्टंट पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.