झोप पूर्ण न होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. तसेच झोप पूर्ण होण्याचे अनेक फायदे आहेत. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या कामावर होतोच. आपण ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल. अनेकांना त्यात तथ्य नसून, ते एक मिथक वाटतं. पण ब्यूटी स्लीप मिथक नसून, सत्य आहे. एका नव्या संशोधनानुसार, वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो, असा दावा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, जर एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. ज्यांची झोप वेळेवर होते, त्यांचं आरोग्यही चांगलं असतं, तसेच ते सदैव उत्साही असतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.