चेरीची आंबट-गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते. चेरी खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे की,अनेकजण चेरी बियांसकट खातात. परंतु असे केल्यास शरीरासाठी ते घातक ठरू शकते. कारण चेरीच्या बियांमध्ये हायड्रोजन सायनाइड असते. हिरवा बटाटा कधीही खाऊ नये कारण कच्चा बटाटा विषारी असतो. बदाम खरेदी करताना त्यावर प्रक्रिया न केलेले बदाम ओळखता आले पाहिजेत. प्रक्रिया न केलेले बदाम आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. सफरचंद खाताना सफरचंदाच्या बिया खात नाहीत याची काळजी घ्यावी. जुलाब ते पोटदुखी यांसारख्या समस्या त्याच्या बियांमुळे होऊ शकतात. लाइकोपीनमुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्यात टोमॅटोच्या भाजीऐवजी सॅलड, सूप आणि ज्यूसच्या स्वरूपात जास्त प्रमाणात सेवन करावे. टोमॅटो वापरताना, त्यावरील मुकुटासारखे छोटे हिरवे स्टेम काढून टाकल्याची खात्री करा. कारण हे स्टेम विषारी आहे यामुळे वेदना होऊ शकतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.