साऊथची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नयनतारा लवरच विवाह बंधनात अडकणार आहे.

9 जून रोजी नयनतारा दिग्दर्शक विघ्नेश सिवनसोबत लग्न करणार आहे.

साऊथचा हा भव्य विवाह महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये होणार असून यामध्ये देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत.

या लग्नासाठी वधू-वरांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह आपल्या सहकारी कलाकारांना आमंत्रित केले आहे.

नयनताराचे लग्न हाय प्रोफाईल असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नयनतारा आणि विघ्नेश सिवन गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

या दोघांनी अनेकवेळा एकत्र काम केले आहे.

सेटवरच दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली.

गेल्या वर्षी त्यांची एंगेजमेंट झाली आणि आता दीड वर्षांच्या एंगेजमेंटनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.