अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.



विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो.



सध्या नवाजुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.



नवाजुद्दीन सध्या मुंबईमधील त्याचं आलिशान घर सोडून एका हॉटेलमध्ये राहतोय अशी चर्चा आहे.



नवाजुद्दीनने हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेण्याचं कारण हे त्याच्या कुटुंबामधील होणारे वाद आहे, असं म्हटलं जातंय.



नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत.



आलियानं नवाजुद्दीन आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत



त्यामुळे आता नवाजुद्दीननं घर सोडून हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.



एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुन्निसा आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहेत.



आई आणि आलिया यांच्यामधील वाद जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत नवाज हा हॉटेलमध्ये राहणार आहे, असं म्हटलं जात आहे.