बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवाजुद्दीनच्या एका आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नवाजुद्दीनचा ‘जोगीरा सारा रा रा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे. ‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ‘जोगीरा सारा रा रा’ हा चित्रपट 12 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो, ठाकरे, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात.