अभिनेत्री शेफाली शाह ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकते. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेफाली शाहनं तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं.



एका पॉडकास्टमध्ये शेफालीनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला.



शेफाली म्हणाली, 'मला आठवतंय, मी एकदा बाजारात गेले होते, तेव्हा एक माणूस माझ्या जवळून गेला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. '



शेफालीनं पुढे सांगितलं, अशा प्रसंगानंतर आपणच अपराधी आहोत, अशी भावना तुमच्या निर्माण होते , तुम्हाला लाज वाटते आणि तुम्हाला हे सर्व विसरावे असेही वाटते.'



शेफालीने 'गांधी माय फादर', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'द जंगल बुक' आणि 'कमांडो' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.



शेफाली शाह ही नुकतीच 'दिल्ली क्राइम', 'डॉक्टर जी' आणि 'डार्लिंग्स' या चित्रपट आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.



आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'चित्रपटात शेफालीनं घरगुती हिंसाचार पीडितेच्या आईची भूमिका साकारली होती.



शेफाली शाहचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.



शेफालीचा ही सोशल मीडियावर सक्रिय असते.