देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच 'सिटाडेल' (Citadel) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



प्रियांका चोप्राने 'सिटाडेल' च्या प्रमोशनदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.



फोटोमधील प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.



'Citadel has arrived in London…' असं कॅप्शन प्रियांकानं या फोटोला दिलं आहे.



प्रियांका ही सध्या लंडनमध्ये 'सिटाडेल' या सीरिजचे प्रमोशन करत आहे.



'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.



प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



प्रियांकाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.



प्रियांकाचा चाहता वर्ग मोठा आहे.