अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सलमानच्या सिक्स पॅक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमाननं त्याचे सिक्स पॅक्स दाखवले. तो म्हणाला,' तुम्हाला वाटतं वीएफएक्समुळे होते. आधी चार होते आता सहा झाले आहेत.'' 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमानचा चाहता वर्ग मोठा आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.