रताळे घेऊन ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवून त्याचा मागचा व पुढचा भाग कापा



मग रताळ्याचे पातळ काप करून घ्या आणि त्या कापांना तेल लावा



नंतर त्यावर 1 चमचा लाल तिखट, मीठ घालून, सर्व रताळ्याच्या कापांना चांगले चोळून घ्या



रताळ्याच्या कापांना वरी तांदळाच्या पिठात चांगले घोळवून घ्या



नंतर एका पॅनमध्ये तेल चांगले लावून घ्या



त्यावर थोडे आणखी तेल घालून 4 ते 5 मिनिटे तळून घेतले



काप शिजले की नाही हे पाहा



त्यासाठी सुरीने रताळ्याच्या कापामध्ये सुरी जर व्यवस्थित बाहेर आली तर काप शिजले



अशा पद्धतीने रीतीने सर्व काप तळून घेतले.



सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले उपवासाचे गरमा गरम रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप.