नवरात्रीच्या उपवासात या पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही नऊ दिवस उपवास करूनही उत्साही राहाल.
नऊ दिवसांच्या उपवासात नारळ पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही.
ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारची ऊर्जा मिळते.
उपवासात जेव्हाही थोडी भूक लागेल तेव्हा काही ड्रायफ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा.
उपवास असताना सकाळी ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय आहे.
ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
तुम्ही एक ग्लास थंड दूध पिऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरेल.
तुम्ही दह्यापासून लस्सी बनवून पिऊ शकता. दुपारच्या जेवणाच्या लस्सी पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहील.
उपवासात हलकी भूक लागण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. फ्रूट चाट खाल्ल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.