आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. दरवर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खते, बियाणे याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीपुढे नैसर्गिक संकट येत आहेत. नैसर्गिक संकटाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभावाचे संरक्षण देण्यात यावं सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा हे देखील शेतीसमोरील संकट आहे. तापमान वाढ हे सुद्धा शेतीसमोरील मोठं संकट आहे. 100 टक्के पिकांना हमीभाव मिळावा. सध्या देशात 4 ते 5 टक्के पिकांना हमीभाव असतो.