राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज नागपुरात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन पार पडले,
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनेक महत्वांच्या बाबींवर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले,
यंदा संघ स्थापनेच्या 100 व्या वर्षात प्रवेश करत आहे.
देश बलशाली व्हायचा असेल तर प्रजेत चारित्र्य असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय चारित्र्याच्या जोरावर देश मोठा होतो.
बांगलादेशमध्ये अनुकुल चंद्र ठाकूर यांनी तेच प्रयत्न केले होते,
असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.