भारतीयांच्या जेवणात मोठ्या आवडीने लोणच्याचा समावेश केला जातो. लोणच्याचे अनेक प्रकार असून प्रत्येक लोणच्याची चव निराळी असते. लोणच्यामध्ये मीठ, तेल आणि इतर मसाल्यांच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे अति जास्त लोणचं खाणे मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. ज्यामध्ये शरीरातील हाडे कमजोर होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढू शकते. पचन क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो. बीपी संबंधित समस्या जाणवू शकतात. हृदयचे स्वास्थ्य देखील बिघडू शकते. त्यामुळे अति जास्त लोणाचं खाणे टाळले पाहिजे.