चार वर्षांचा संसार मोडून समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेण्याचे कारण खासगी ठेवले होते. परंतु, दोघांच्या नात्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले होते. दोघांशी संबंधित जुने किस्सेही प्रचंड व्हायरल झाले आहेत. यापैकी एक म्हणजे नागा चैतन्यसाठी सामंथाने केलेली प्रशंसा. समंथा आणि नागा चैतन्य आज वेगळे झाले असले तरी एक काळ असा होता, जेव्हा दोघांमध्ये खूप प्रेम आणि समजूतदारपणा होता. समंथाने स्वतः चैतन्यचे कौतुक करताना सांगितले होते की, नागा खूप बुद्धिमान आहे. ते दोघेही घरात चित्रपटाबाबत चर्चा करत नाहीत चैतन्य एक अभिनेता असल्याने त्याला समजते की चुंबन घेणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे. कामावरून परतल्यावर आम्ही फक्त घर आणि विश्रांतीबद्दल बोलतो, असे समंथाने सांगितले होते.