बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या चर्चेचा एक भाग बनला आहे. यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.



पुन्हा एकदा हृतिक आणि सबा डिनर डेटवर गेले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.



हृतिक आणि सबा पुन्हा एकदा एकमेकांचा हात धरून डिनर डेटसाठी जाताना दिसले.



कॅफेमधून बाहेर येताच पापाराझींनी या कपलला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.



यादरम्यान सबाने तिचा चेहरा केसांनी झाकून घेतला होता, तर हृतिकही टोपीने चेहरा लपवताना दिसला. यावेळीही हृतिकने सबाचा हात धरला होता.



सबा आणि हृतिकला पुन्हा एकदा एकत्र पाहून, त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.